विकसित भारतासाठी प्रत्येकाने झोकून देवून काम करण्याची गरज : केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

कोल्हापूर – विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नांसाठी प्रत्येकाने झोकून देवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. करवीरनगर वाचन मंदिराच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यपाल आर्लेकर यांनी, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कामाचे कौतुक केले. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, भटके विमुक्त विकास परिषद आणि प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी यांनी यावेळी मनोगतं व्यक्त केली. यावेळी उदय सांगवडेकर, डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ, नंदकुमार जोशी, नंदकुमार मराठे यांच्यासह करवीर नगर वाचन मंदिराचे संचालक आणि सभासद उपस्थित होते.