मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना 2029 च्या निवडणूकीत धडा शिकवण्याचा जरांगेंचा इशारा

<p>मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना 2029 च्या निवडणूकीत धडा शिकवण्याचा जरांगेंचा इशारा</p>

छत्रपती संभाजीनगर - "२०२९ ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना आठवणीने पाडायचं," असे निर्देश मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी  मराठा समाजाला दिले आहेत. त्यामुळे नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर ते बोलत होते. 
"शेतीवर मोठमोठी संकटं येतात आणि शेती उद्ध्वस्त होते. इतर समाजातील लोकांना शेती आणि नोकरी असे दुहेरी आधार आहेत, पण मराठा शेतकऱ्याला आधार नाहीये. त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागू न देता ते ताकदीने टिकवले पाहिजे आणि राहिलेल्या मराठ्यांना देखील आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी आरक्षणाविरोधात गेलेल्या नेत्यांना २०२९ च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा  त्यांनी दिला आहे.