धनुष्यबाण चिन्हावरील अंतिम सुनावणी पुन्हा पुढे ढकलली...

नवी दिल्ली - आज शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी होणार होती परंतु सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज अंतिम निर्णय होणार होता परंतु कोर्टाने १२ नाेव्हेंबरपासून अंतिम सुनावणी हाेईल, असे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला अंतिम निकालासाठी आणखीन प्रतिक्षा करावी लागणार आहे.