अनिल परब यांचा रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल; मृत्युपत्र, मंत्रिपद व दलालीवरून प्रश्नांची सरबत्ती

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर परब यांनी रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल करत अनेक गंभीर मुद्द्यांवर सवाल उपस्थित केलेत.
प्रमुख मुद्दे व आरोप:
➡️ १९९३ मधील ज्योती कदम प्रकरण: "ज्योती कदम यांना जाळलं की जाळून घेतलं?" – या प्रकरणाची चौकशी व नार्को टेस्ट करण्याची अनिल परब यांची मागणी...
➡️स्विस बँक खात्याचा उल्लेख: "ठसे घेऊन स्विस बँकेच्या खात्यातून पैसे काढता येतात का?" – असा सवाल करत त्यांनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्याच्या दाव्यावर शंका व्यक्त केली.
➡️ जर उद्धव ठाकरे वाईट होते, तर रामदास कदम यांनी २०१४ मध्ये का मंत्रीपद घेतले? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
➡️ "मी बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचा साक्षीदार आहे, ट्रस्टी आहे, मृत्युपत्र कोर्टात आहे – शंका असेल तर कोर्टात जा."
तसेच, "बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचं राजकारण करू नका" असा इशारा.
➡️ अब्रूनुकसानीचा खटला: परब यांनी सांगितले की, ठाकरे कुटुंबावर खोटे आरोप केल्याबद्दल रामदास कदमांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल.
➡️ "आमच्या लेखी रामदास कदम यांची किंमत शून्य आहे." – अशा शब्दांत परब यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
➡️ परब यांनी दावा केला की, "रामदास कदमांकडे दलालीचे पैसे आहेत" आणि हा देखील चौकशीचा विषय ठरू शकतो.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबावर बाळासाहेबांच्या वारसाहक्कावरून व मृत्युपत्रावरून केलेल्या टीकेनंतर हे वाद उफाळून आले. निवडणुका जवळ येत असल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येत आहे.