ही लोकं माझी नाहीत...: मंत्री पंकजा मुंडे यांची मेळाव्यात टीका 

<p>ही लोकं माझी नाहीत...: मंत्री पंकजा मुंडे यांची मेळाव्यात टीका </p>

बीड -  आज दसऱ्यानिमित्त बीडच्या नारायण गडावर मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मेळावा पार पडत आहे. यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे. नुकताच मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. यावेळी लोकांनी मोठा गोंधळ करून मंत्री पंकजा मुंडे यांना मेळाव्यात बोलताना अडथळा निर्माण केला. यावेळी मंत्री मुंडे यांनी, “मेळाव्यात गोंधळ घालणारी ही लोक माझी नाहीत” असे नाव न घेता जरांगेना टोला लगावला.

संकटात जात-पात सोडून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. दोन घास कमी खा पण स्वाभिमानी राहा. संकटात जात-पाच सोडून एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.  प्रत्येक जातीपातीच्या लोकांसाठी मी लढणार आहे. जातीपातीचे राक्षस संपण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी  म्हटले आहे.