आर्थिक सामर्थ्य काही निवडक लोकांच्या हातात एकवटल्याने सामाजिक शोषण होतय : सरसंघचालक

नागपूर - अमर्याद विकासामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे. आर्थिक सामर्थ्य काही निवडक लोकांच्या हातात एकवटत आहे, ज्यामुळे सामाजिक शोषण आणि पर्यावरणाची मोठी हानी होतं असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. ते आरएसएसच्या दसरा मेळाव्यात संबोधित करताना बोलत होते.
यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
देशाच्या धोरणांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली न होता स्वेच्छेने व्हावा. घरात तयार होणाऱ्या गोष्टींसाठी बाहेरच्या वस्तूंचा वापर टाळावा, असे म्हणत त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर देण्याचं आवाहन केले.