भाजपच्या ‘या’ प्रवक्त्यांकडून खा. राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली - भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या झाडून मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी त्यांनी एका टीव्ही वाहिनीवर चर्चा करत असताना दिली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर केरळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
प्रिंटू महादेवन यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे.