आज समस्त कोल्हापूरकरांकडून धाराशिवकडे मदत रवाना...
आ. सतेज पाटील यांच्या आवाहनाला कोल्हापूरकरांची साथ

कोल्हापूर – मराठवाड्यातील पूरग्रस्तांना कोल्हापूरकडून मदत देण्यात यावी, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केलं होतं. त्यानुसार कोल्हापूरकरांनी भरघोस मदत दिली आहे ही जमा झालेली मदत ट्रकमधून आज धाराशिवकडे रवाना करण्यात आली आहे.
यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आ. सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत कसबा बावड्यातील भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ट्रक मराठवाड्याकडे रवाना करण्यात आले.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तोफीक मुल्लानी, राहुल माने, मोहन सालपे, सुभाष बुचडे, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, बाबासो चौगुले यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.