खा. असदुद्दीन ओवैसींना कोल्हापुरात जोरदार विरोध...

कोल्हापूर - एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी आज कोल्हापूर दोऱ्यावर येत आहेत. यावेळी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून जोरदार विरोध केला जात आहे.
खा. असदुद्दीन ओवैसी नमाज पठण करण्यासाठी बागल चौकातील मज्जिदमध्ये येणार असल्याची माहिती हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बागल चौकात जमा झाले आहेत. खा. ओवैसी या ठिकाणी आल्यास तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा हिंदूवादी संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.