...तर अशा अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू- आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा

<p>...तर अशा अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू- आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा</p>

कोल्हापूर -  बैठका घेवून सूचना करूनही रस्त्यांच्या कामात सुधारणा होत नसेल तर यापुढं हे खपवून घेतलं जाणार नाही. कुणाचाही  मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांची सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून शासकीय विश्रामगृहावर आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झालीय. नवरात्र उत्सवामुळं करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक येतात.मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळं शहराची आणि पर्यायानं लोकप्रतिनिधींची बदनामी होत आहे. वारंवार बैठका घेवून आणि सूचना देऊनही अधिकारी ऐकत नसतील तर यापुढं कुणाचीही  गय करणार नाही, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलाय. कुणाचाही  मुलाहिजा न बाळगता, अधिकाराचा वापर करून येत्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांची सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू, असा सज्जड इशारा त्यांनी  दिलाय. शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे. पण दर्जेदार काम दिसून येत नाही. महानगरपालिका अधिकाऱ्यांचं  यावर नियंत्रण नाहीय. महानगरपालिकेची सल्लागार कंपनी, वॉर्ड अधिकारी,आणि  उपअभियंत्यांनी जाग्यावर जावून पाहणी करावी अशी सूचना देखील त्यांनी या बैठकीत केलीय.