रविकिरण इंगवलेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : रणजीत जाधव

<p>रविकिरण इंगवलेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : रणजीत जाधव</p>

कोल्हापूर – आ. राजेश क्षीरसागर यांनी शहरात विविध विकास कामे केली आहेत. मात्र केवळ त्यांना, शिवसेना पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खोटे आरोप करत आहेत. रविकिरण इंगवले यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्तातून होत आहेत, अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख रणजीत जाधव यांनी केली आहे.

 गांधी मैदानाच्या कामासाठीसह शहरातील रस्त्यांसाठी सुमारे १०० कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. ही कामे प्रगती पथावर असताना उगाचच आपल्या बगलबच्च्यांना घेवून आंदोलनाची स्टंटबाजी करायची हा एकमेव उद्योग ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडे राहिला आहे. गुंड प्रवृत्तीच्या आणि हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या रविकिरण इंगवले यांनी जिल्ह्यातील लोकनेत्यांवर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली जात, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

पत्रकार बैठकीला उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, युवासेना उपशहरप्रमुख अमृत परमणे उपस्थित होते.