‘शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याची हीच खरी वेळ’ : उद्धव ठाकरे

<p>‘शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याची हीच खरी वेळ’ : उद्धव ठाकरे</p>

मुंबई - मराठवाड्यातील शेतकऱ्यांची खूप वाईट परिस्थिती आहे. हिचं खरी वेळ आहे या शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याची, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मराठवाड्यातील पूर स्थितीवर माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी संजय राऊत, अंबादास दानवे, ओमराजे, कैलास आणि शिवसैनिकांनी एक दिवस मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. आताची परिस्थिती भयानक आहे..अजूनही काही भागात जोरात पाऊस सुरु आहे हातात आलेल्या शेतकऱ्यांचा हातात आलेला घास गेला आहे. हा शेतकऱ्यांचाच नाही तर आपला देखील घास गेला आहे. त्यात त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. आता दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. दिलेली मदत पाहिली तर आठ दहा हजार फक्त साफसफाई करण्यासाठीच जातील, त्यानंतर शेतकरी पीक काढायला घेईल. त्यांनी १४ हजार कोटींची जाहीर केलेली मदत अजून पोहचलेली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारला केली