काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अन् नेत्यांना माझा आग्रह आहे की...: मराठवाड्यातील अतिवृष्टीवर खा. राहुल गांधींचं आवाहन

बीड – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच काही लोकांपर्यंत मदतही पोहचत नाही, यावर मदत करण्याचे आवाहन खा. राहुल गांधी यांनी प्रशासनासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना केले आहे.
“महाराष्ट्राच्या मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाल्याचं वृत्त वेदनादायी आहे. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना पीडित कुटुंबीयांसोबत आहेत. माझी सरकार व प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी बचावकार्य वेगाने करावे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी या कामी प्रशासनाला सहकार्य करावे व गरजू व्यक्तींना शक्य ती सर्व मदत करावी”, असे म्हटले आहे.