आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय? : उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले...व्हिडीओ व्हायरल

<p>आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय? : उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले...व्हिडीओ व्हायरल</p>

बीड -  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्याचे सर्व मंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अशीच पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवमध्ये केली. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना ते चांगलेच संतापल्याचे पहायला मिळाले. त्यांचा संतापल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना,  कर्जमाफीवर प्रश्न विचारला गेल्याने ते संतापले. संतापलेल्या पवारांनी तरुणांना उद्देशून म्हणाले याला द्या रे मुख्यमंत्रीपद, ते पुढे म्हणाले "सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही" आम्ही इथे "गोट्या खेळायला" आलेलो नाही. यावेळी अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला होता.