पूर परिस्थितीची दखल घेऊन राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकला 

आ. सतेज पाटील यांची आयोगाकडे मागणी 

<p>पूर परिस्थितीची दखल घेऊन राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकला </p>

कोल्हापूर – सध्या मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या २८ सप्टेंबर रोजी राज्यसेवेची परीक्षा होत आहे या परीक्षेला मराठवाड्यातील विद्यार्थी मुकू नयेत यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परिस्थितीची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलावी, जेणेकरून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी आ. सतेज पाटील यांनी आयोगाला केली आहे.