अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवरील फोटोवरून आ. रोहित पवारांचा हल्लाबोल  

<p>अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवरील फोटोवरून आ. रोहित पवारांचा हल्लाबोल  </p>

मुंबई -  मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना सर्व स्तरातून मदत दिली जात आहे. अशीच मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात येत आहे परंतु ही मदत देताना नेत्यांची फोटो लावत असल्याने उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर आ. रोहित पवार यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून हल्लाबोल केला आहे. 
आमदार रोहित पवार म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे साहेब आणि ‘रॅपिडो’फेम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोची साईज खूप लहान असून यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावेत. म्हणजे लोकांच्या डोळ्यातले दुःखाश्रू थांबतील आणि लोकं फोटो बघून आनंदाने हसतील.”