'आम्ही शेतकऱ्यांना मदत करताना अधिकचे निकष लावणार नाही’ : मुख्यमंत्री

सोलापूर – काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना सूचना दिल्यानंतर आज मराठवाड्यातील अनेक नुकसानग्रस्तांच्या बांधावर राज्याचे मंत्री दाखल झाले आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी, 'आम्ही शेतकऱ्यांना मदत करताना अधिकचे निकष लावणार नाही. जिथं गरज आहे तिथं निकष शिथील केले जातील. नागरिकांच्या सोयीचे सर्व निर्णय घेतले जातील. निर्णय घेताना पूरग्रस्त नागरिक केंद्रस्थानी ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत.