मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी चला, मदतीचा हात पुढे करूया ! : आ. सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर – मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे.
कोल्हापूरकरांनो, आपणही महापुराचा वेदनादायक अनुभव घेतलाय. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. आज आपली वेळ आहे, ही आपली जबाबदारी आहे. तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल.
मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी चला, मदतीचा हात पुढे करूया ! आपली मदत आज दि. 24 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत जमा करा. 29 तारखेला मदतीचा ट्रक मराठवाड्याकडे रवाना होईल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले आहे.