रविकिरण इंगवलेंचा आमदार क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख चव्हाण यांच्यावर हल्लाबोल
रविकिरण इंगवलेंचं आ. राजेश क्षीरसागर यांना चॅलेंज

कोल्हापूर - गांधी मैदानाच्या विकासा वरुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करतायत. आज सुध्दा त्यांनी 'आमदार क्षीरसागरांनी गांधी मैदानाच्या विकासासाठी आलेला निधी खाल्लाय' असा गंभीर आरोप करत त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी आपल्या विरोधात न्यायालयात जावं असं आव्हान दिलंय. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यावरही इंगवले यांनी बोचरी टीका केलीय.
रविकिरण इंगवलेंनी इव्हिएम शिवाय निवडणुका घ्या, मग पाहा तुमची कोल्हापुरात एकतरी सीट येतीय का? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय.
रविकिरण इंगवलेंच्या या आरोपांमुळं शिंदेसेनेचे आमदार आणि जिल्हाप्रमुख तसंच ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.