राज्यात स्त्रीमुक्तीची चळवळ पुन्हा उभारली पाहिजे : खा. सुप्रिया सुळे
कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया भाग दोन या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर – सध्या स्त्रीमुक्तीची चळवळ राज्यात संपलीय ती पुन्हा उभं करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठात स्वर्गीय शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन तर्फे स्त्री सक्षमीकरण आव्हाने आणि संधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्त्री सक्षमीकरण आव्हाने आणि संधी या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्रियांसाठी शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन खूप महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समाज उद्धारासाठी दाभोळकर, पानसरे कुटुंबांची नावं इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहीली जातील. महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे, त्यांच्या हाताला काम मिळणे सुद्धा तितकंच गरजेचे असल्याने त्यांनी सांगितले. सध्या महिला सरपंच अडून पुरुषच सत्ता चालवत असतात. या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. समाज म्हणून याचे आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र आधी सारखा पुरोगामी राहिला आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरोज पाटील यांनी, सुप्रिया सुळे माझी भाची असल्याचा मला अभिमान आहे. तसंच त्यांनी आई शारदाबाई यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डॉ भारती पाटील यांनी संपादित केलेलं कोल्हापूरातील कर्तृत्ववान स्त्रिया भाग दोन या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
या प्रसंगी प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे, डॉ उर्मिला दशवंत, प्रांजली शिरसागर, व्ही बी पाटील, हसीना फरास, डॉ. माया पंडित, साधना घाटगे, अनुराधा भोसले, विजयमाला देसाई, पद्मजा तिवले, गीता हसूरकर, सीमा पाटील आदी उपस्थित होत्या.