आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा : मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना निर्देश

मुंबई – मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मंत्री मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.