मराठवाड्यातील अतिवृष्टीवर खा. शरद पवार म्हणाले...

मुंबई – बारा महिने दुष्काळ असणाऱ्या मराठवाड्यात अचानक मोठा पाऊस पडल्याने अतिवृष्टीचं संकट ओढवले आहे. यावर खासदार शरद पवार यांनी, “दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
खा. शरद पवार म्हणाले कि, राज्य सरकारने केंद्राच्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी मदत करावी, अशी विनंती केली आहे. “आपण दुष्काळ पाहिला. पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते.