ऊस दराबाबत रणशिंग फुंकणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना सज्ज

गळीत हंगाम सुरू करण्याची

<p>ऊस दराबाबत रणशिंग फुंकणार – स्वाभिमानी शेतकरी संघटना सज्ज</p>

जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २४ व्या ऊस परिषदेच्या रणशिंगाचा प्रारंभ करण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलाय. हा महत्त्वपूर्ण मेळावा जयसिंगपूर–उदगांव रोडवरील कल्पवृक्ष गार्डन इथं पार पडणारय. या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी संबोधित करणार असून या मेळाव्यात २४ व्या उस परिषदेची तारीख जाहीर करण्यात येणारय.

राज्यात पुढील आठवड्यात उस गळीत हंगामासंदर्भात मंत्रिमंडळ समितीची बैठक होणार असून त्यात गळीत हंगाम कधी सुरू करायचा याबाबत निर्णय घेतला जाणारय. कर्नाटकातील कारखान्यांनी १० ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी दाखवलीय. यंदाच्या वर्षीच्या उस परिषदेचं रणशिंग फुंकण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कल्पवृक्ष गार्डन येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणारयत. बैठकीतून शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणारय. उस परिषदेच्या जाहीर होणाऱ्या तारखेकडे संपूर्ण राज्यातील आणि सीमाभागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलंय. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मेळाव्यातून ऊस दर, एफआरपी, हंगामाची सुरुवात आणि इतर मागण्यांसाठी निर्णायक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.