विरोधकांच्या आरोपांना आम्ही कामातून उत्तर देणार : आ.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या शिवाजी मंदिरात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज व्हावे, असे आवाहन केले. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा असल्याने शिवसेनेचा जनाधार वाढलाय. मात्र काही मंडळी विनाकारण खोटे आरोप करून आम्हाला बदनाम करत आहेत. पण त्यांच्या आरोपांना कामातून उत्तरे देणार असल्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
यावेळी महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, दिपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक आदी उपस्थित होते.