देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी हे मोठे पाऊल...: पंतप्रधान

नवी दिल्ली – उद्यापासून जीएसटी 2.0 सुधारणांची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी, जीएसटी 2.0मुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे, देशातील 99 टक्के वस्तूंवर केवळ 5 टक्केच कर आकारला जाणार असल्याने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी हे मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशातील लघू, कुटीर, सुक्ष्म उद्योगांना चालना मिळणार आहे. देशातील प्रत्येक राज्याचा विकास होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे ‘एक राष्ट्र, एक कर’चे स्वप्न साकार होणार आहे. कर चक्रव्यूह एक समस्या होती, परंतु जीएसटी सुधारणांमुळे सर्वकाही सोपे झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.