खळबळजनक : राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

<p>खळबळजनक : राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक</p>

मुंबई -  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाऊंट आज सकाळी हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 
हॅकर्सनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकाऊंटवरून पाकिस्तान आणि तुर्कीयेचे झेंडे असलेली पोस्ट शेअर केली आहे. तसेच एक व्हिडीओही पोस्ट केला होता. मात्र काही मिनिटांतच ती पोस्ट डिलीट करून अकाऊंट सुरक्षित करण्यात आले आहे. 

आज आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या अकाऊंटवर पाकिस्तानशी संबंधित व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली. हे अकाऊंट कसे हॅक केले गेले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या झालेल्या सर्व प्रकारामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक होवू लागले तर सर्वसामान्य लोकांच्या ट्विटर अकाऊंटच्या सुरक्षेचे काय असे प्रश्न आता उपस्थित होवू लागले आहेत.