‘आमदार नसतानाही 20 कोटींचा निधी मिळतोय’ : शिंदेंच्या माजी आमदारांचे खळबळजनक वक्तव्य 

<p>‘आमदार नसतानाही 20 कोटींचा निधी मिळतोय’ : शिंदेंच्या माजी आमदारांचे खळबळजनक वक्तव्य </p>

मुंबई – आमदार असलेल्यांना 2 कोटी निधी मिळतो, तर मला आमदार नसतानाही 20 कोटींचा निधी मिळतोय, असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
‘पराभूत झालो तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी असल्याचे’ त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.