माझ्यासह सर्वांना चुका दुरूस्त कराव्या लागतील नाहीतर...

 मंत्र्यांसह नेत्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या

<p>माझ्यासह सर्वांना चुका दुरूस्त कराव्या लागतील नाहीतर...</p>

नागपूर –“आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. माझ्यासह सर्वांना चुका दुरूस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची मोकळी करावी लागेल”, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांसह कार्यकर्ते, नेत्यांना दिल्या आहेत. ते नागपुरात आयोजित राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलत होते. 
“पक्षापेक्षा मंत्री महोदयांना जर इतर महत्त्वाची कामे अधिक असतील तर ते मंत्रीपद आपण मोकळे करूया आणि ते पद दुसऱ्या कुणाला तरी देऊया म्हणजे त्यांना कळेल”, असा दम त्यांनी यावेळी मंत्र्यांना दिला.  
सर्व मंत्र्यांनी मुंबईत किती दिवस थांबणार, मतदारसंघात किती दिवस राहणार आणि पालकमंत्री म्हणून त्या त्या जिल्ह्यात काय कामगिरी करणार याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे देणे अनिवार्य आहे, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी  दिला.