‘अशी गलिच्छ टीका करणं हे योग्य नाही’
खा. शरद पवारांनी फोन करून मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

मुंबई – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी, आ. जयंत पाटील यांच्या वडिलांचं म्हणजे राजाराम पाटील यांचे नाव घेत बेताल वक्तव्य केले आहे. यावर खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी दर्शवली आहे.
खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. पडळकरांची तक्रार केली आहे. "अशी गलिच्छ टीका करणं हे योग्य नाही, या वक्तव्याचा निषेध आहे," असं त्यांनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. फोनच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणात योग्य ती समज पडळकरांना द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.