‘जयंत पाटील हा...’ : आ.गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतापाची लाट  

<p>‘जयंत पाटील हा...’ : आ.गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतापाची लाट  </p>

सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना, “जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा माणूस आपण किती बिनडोक आहे, हे सिद्ध करतोय”, असे वक्तव्य केले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध नोंदवला जातोय.
त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चा काढून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.