‘पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य..!’ ; मंत्री आदिती तटकरेंचं लाडकी बहीण योजनेबाबत ट्वीट

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !” असे म्हणत ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे”