खा. राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली - विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेवून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. यावर आयोगाने खा. राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचं म्हणत आरोप फेटाळून लावले आहे.
खा. राहुल गांधी यांनी सांगितल्या प्रमाणे कोणतंही मत ऑनलाईन डिलिट केले जाऊ शकत नाही..व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची तसंच संधी दिल्याशिवाय कोणतेही मत हटवले जाऊ शकत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. २०२३ मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांना वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला होता अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.