राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत वाढ... 

<p>राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत वाढ... </p>

मुंबई – राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यात येत असल्याची चर्चा असताना वित्त विभागाने राज्यातील मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत पाच लाख रुपयांनी वाढ केली आहे. 

मागील वर्षी कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्र्यांना २५ लाख रुपयांच्या मर्यादेत वाहन खरेदीची मर्यादा होती. पण आता ही मर्यादा ३० लाख रुपयांवर नेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पसंतीनुसार वाहन घेता येणार आहे. त्यामुळे  राज्यावरील कर्जाचा बोजा 9 हजार कोटी रुपयांवर जाणार आहे.