मराठा - ओबीसीमध्ये निर्माण होणारी कटुता ही घातक : खा. शरद पवार 

<p>मराठा - ओबीसीमध्ये निर्माण होणारी कटुता ही घातक : खा. शरद पवार </p>

कोल्हापूर - मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये निर्माण होणारी कटुता आणि संघर्ष ही घातक असल्याचे वक्तव्य खा. शरद पवार यांनी केले आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते मंत्री छगन भुजबळांचा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध होत असल्याच्या मुद्द्यावर बोलत होते. 
 
महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य रहायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या हितासाठी जे योग्य ते झालं पाहिजे. महाराष्ट्रात समाजा-समाजामध्ये आज कटुता वाढली आहे. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी घातक असून महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे,असंही त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, बाजीराव खाडे, रामराजे कुपेकर, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.