जाहिराती करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे देवाभाऊंनी अधिक लक्ष द्यावं; खा. शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

<p>जाहिराती करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे देवाभाऊंनी अधिक लक्ष द्यावं; खा. शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला </p>

कोल्हापूर -  छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल फलक झळकतात. मात्र, सध्या शेतकरी संकटात असूनही कसलीही मदत मिळत नाही, अशी खंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले खा. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळातर्फे आज पन्हाळा येथे मार्गदर्शन शिबिर आयोजीत करण्यात आलय. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी बोलताना शरद पवार यांनी, 'आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टीनं मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही पिकांचे पंचनामे झाले नाहीत. प्रत्यक्ष कधी मदत पोहोच होतेय याकडे शेतकरी आशेने पाहत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपत्तीमधील सोने बाहेर काढून शेतकऱ्यांना मदत केली होती. असा दृष्टीकोन छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. मात्र सध्या शेतकरी संकटात असूनही कसलीही मदत मिळत नाही.  शिवछत्रपतींच्या काळात दुष्काळ पडला त्यानंतर शेतकऱ्यांकडे आधुनिक शेती करायला साधने नव्हती नांगरट करण्यासाठी लोखंडी फाळही नव्हत.  अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपत्तीमधील सोने बाहेर काढून त्याची नांगरट केली. असा दृष्टीकोन छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. परंतु सध्या शेतकरी संकटात असूनही कसलीही मदत शेतकऱ्याला मिळत नाही.' अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. 
तर दुसरीकड देवाभाऊंच्या शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेल्या जाहीराती पाहिल्या मिळतात. एकिकडे शेतकरी अडचणीत आहे या सर्वाकडे देवाभाऊंनी अधिक लक्ष द्यावं'