‘24 तासाच्या आत आरोपीला शोधा’ : राज ठाकरेंची पोलिसांना सूचना

मुंबई – दादरमधील शिवाजी पार्क येथील अज्ञात व्यक्तीकडून स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तातडीने शिवसैनिकांनी हा लाल रंग कपड्याने फुसून काढला. पुतळ्याची स्वच्छता शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले आहेत. 24 तासाच्या आत आरोपीला शोधा अशा सूचना राज ठाकरेंनी पोलिसांना दिल्या आहेत.