शिवाजी पार्क परिसरात तणाव 

“अशा प्रकारच्या कृत्याचा मी धिक्कार करतो” : भाजपा नेते प्रवीण दरेकर

<p>शिवाजी पार्क परिसरात तणाव </p>

मुंबई -  मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर दादरमधील शिवाजी पार्क परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी, "अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांचा मी धिक्कार आणि निषेध करतो, लवकरात लवकर तपास करुन प्रकऱण मार्गी लावावं असं माझं पोलिसांना आवाहन” असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे कि, मीनाताई ठाकरे या वात्सल्यमूर्ती होत्या, त्यांना माँसाहेब म्हणायचे. त्यांना महाराष्ट्रात मातृतूल्य आदराचं स्थान होतं. त्यामुळे एखाद्या विकृत मानसिकतेतून हे झालं असावं. एखादा विकृत मानसिकतेचाच हे करु शकतो. पोलीस त्याचा शोध घेतील. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याला पकडून सर्वांसमोर आणतील असा मला विश्वास आहे. निश्चित यामागे तणाव निर्माण करण्याचा  किंवा इतर काही उद्देश असावा.