राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखी : खा. संजय राऊत

<p>राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखी : खा. संजय राऊत</p>

मुंबई - राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत २४ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. त्यामुळे  राज्याची आर्थिक स्थिती नेपाळसारखी झाली असल्याचे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केले आहे. 
खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि,  लाकडी बहिण योजना, कौशल्य विकास आणि एसआरए योजनेमुळे राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की, ते आम्हाला माओवादी ठरवतात. नेपाळही असाच लुटला गेला. आर्थिक असंतोषातूनच नेपाळची जनता रस्त्यावर उतरली आणि सरकारविरोधात बंड केले.