मनसेच्या संघटनात्मक वाढीसाठी येत्या शनिवारी यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले कोल्हापूर दौऱ्यावर...

<p>मनसेच्या संघटनात्मक वाढीसाठी येत्या शनिवारी यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले कोल्हापूर दौऱ्यावर...</p>

कोल्हापूर – राज्यामध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी मनसेचे नियुक्त नूतन संपर्क अध्यक्ष तथा मुंबई महानगरपालिकेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले हे येत्या शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक ते घेणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनात्मक वाढीसाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि  पक्षामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष संजय चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, अमित पाटील यांनी केले आहे.