अखेर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधावर शिक्कामोर्तब..!

 

काँग्रेसने घेतली भूमिका... 

<p>अखेर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधावर शिक्कामोर्तब..!</p>

<p> </p>

मुंबई - बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काँग्रेसची मनधरणी केली  जात होती. अखेर त्याला यश आले आहे. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेवून आम्ही बारामतीतून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक  बिनविरोध झाली यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले  आहे. 
बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध व्हावी , यासाठी अजित पवार गटाच्या नेत्यांनी विनंती केली . त्या अनुषंगाने वरिष्ठ  नेत्यांशी आमची चर्चा झाली. यावेळी आम्ही निवडणूक लढण्यावर ठाम होतो पण महाराष्ट्राची सभ्यता आणि संस्कृती पाळायला हवी म्हणून आम्ही माघार घेत असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घोषित केले आहे.