बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांसह अनेकांचे फोन 

<p>बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांसह अनेकांचे फोन </p>

मुंबई - बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. रोहित पवार  यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर येत आहे. 

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर आज दुपारपर्यंत अर्ज माघारीची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसने अर्ज माघार घेवून ही निवडणूक  बिनविरोध करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतोनात प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का हे आता पहावे लागणार आहे.