उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरोधात ‘इतक्या’ उमेदवारांकडून अर्ज दाखल...
बारामती – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. सध्या या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून खूप प्रयत्न केले गेले. परंतु काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने दोन्ही पक्षाकडून रस्सीखेच सुरु झाली आहे. असे एकीकडे असताना दुसरीकडे सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बारामती निवडणुकीत नेमक काय होतं हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.