मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार..?
बीड - मस्साजोग ग्रामपंचायतीसह बीड जिल्ह्यातील 16 ठिकाणी सरपंच तर 72 ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु सर्वांचे लक्ष मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लागले आहे. ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीवर बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांनी जे काम केलं आहे, तोच मानस गावकऱ्यांचा असणार आहे. माझ्या वहिनीला सरपंच पदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे. येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल याकडे गावकऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे.