शक्तीपीठ महामार्गातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ७० हजार कोटीचा ढपला पाडणार आहात : राजू शेट्टींचा आरोप 

<p>शक्तीपीठ महामार्गातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ७० हजार कोटीचा ढपला पाडणार आहात : राजू शेट्टींचा आरोप </p>

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार असल्याचे म्हणत सुधारित आराखडा मंजूर झाल्याचे म्हटले आहे. यावर फेसबुक पोस्ट करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी, “विकासाला आमचा विरोध नाही मात्र, शक्तीपीठ महामार्गाच्या ८५३ किलोमीटर रस्त्याचा खर्च १ लाख कोटी म्हणजे  १ किलोमीटरचा खर्च तब्बल ११७ कोटी २३ लाख रूपये येतो. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ७० हजार कोटीचा ढपला पाडणार आहात, असा आरोप केला आहे. 

“तुम्ही पारदर्शी असाल, तुमच्या मनात पाप नसेल तर आय.आय.टी रूरक्की किंवा आय.आय.टी मुंबई यांचा शक्तीपीठ महामार्गाचा अहवाल मागवून राज्यातील जनतेसमोर सादर करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.