त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं होतं...: आ. अमोल मिटकरी
सेलच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आ. मिटकरी यांची प्रतिक्रिया
पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ह्यात असताना पक्षातील काही सेलच्या अध्यक्षांनी त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. यावर बोलताना आ. अमोल मिटकरी यांनी, काही सेलच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली हे मला माध्यमातून समजलं. त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं होतं, घाई गडबड करायची गरज नाही. राजीनामा दिले होते पण अजित पवारांनी स्वीकारले नव्हते, असा त्यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे आता पक्ष या राजीनाम्यावर काय निर्णय घेतो हे पहावे लागणार आहे.
आ.अमोल मिटकरी यांनी या राजीनाम्यावर म्हटले आहे कि, भविष्यात ही बाब चिंताजनक ठरू शकते, भविष्यात सुनेत्रा वहिनी योग्य तो निर्णय घेतील. ज्यांची नाराजगी असेल ती दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, असे म्हटले आहे.