आम्ही ही जागा शरद पवारांसाठी…: खा. संजय राऊत
मुंबई – भाजपकडून राज्यसभेच्या सदस्य पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर बोलताना खा. संजय राऊत यांनी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली असल्याचे म्हटले आहे. आम्ही ही जागा शरद पवारांसाठी सर्वांनी सोडली आहे. त्यांनी पुन्हा राज्यसभेत जावं यासाठी हा निर्णय घेतला, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपने विनोद तावडे यांना उमेदवारी दिली आहे यावर बोलताना त्यांनी, विनोद तावडेंचे राजकीय पुनर्वसन वाटत नाही. कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते हे सतत पक्षाचं काम करत असतात. मी त्यांना फार आधीपासून ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते दिल्लीपर्यंत त्यांनी काम केलं आहे. बिहार, केरळात त्यांनी काम केलं. अशावेळी पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो सन्मान असतो, असेही खा. संजय राऊत म्हणाले आहेत.