विरोधी बाकावर असलो तरी शहराच्या विकासासाठी पाठपुरावा करणार : शिवशाहू विकास आघाडी

<p>विरोधी बाकावर असलो तरी शहराच्या विकासासाठी पाठपुरावा करणार : शिवशाहू विकास आघाडी</p>

इचलकरंजी - महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कम्युनिस्ट पक्ष या पक्षांनी एकाच छताखाली येत शिव - शाहू विकास आघाडीची स्थापना केली होती. या निवडणुकीत आघाडीचे सतरा उमेदवार निवडून आले आहेत. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार बैठक घेत सक्षम विरोधक म्हणून काम करणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले.

आम्ही विरोधी बाकावर असलो तरी आमचे नगरसेवक कामातून शहराचा विकास घडवतील, असा विश्वास मदन कारंडे यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावचकर यांनी, आम्ही विरोधी बाकावरुन जनतेला न्याय देण्याचे काम करू जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असे सांगितले. या पत्रकार बैठकीला कम्युनिस्ट पक्षाचे सदा मलाबादे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवी गोंदकर, राहुल खंजीरे, प्रकाश मोरबाळे, यांच्यासह आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.