कबनूर चौकात राजकीय नेत्यांना डिवचणारे फलक लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ...

<p>कबनूर चौकात राजकीय नेत्यांना डिवचणारे फलक लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ...</p>

इचलकरंजी - शहराजवळच्या कबनूर चौकात झळकलेल्या फलकामुळे पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कबनूर चौकात थेट राजकीय नेत्यांना डिवचणारे फलक लागले गेले आहेत. फलकावर कबनूर - कोरोची मतदारसंघातून उमेदवारी कोणाला ?,  गुन्हेगारांना की गुन्हेगारी कुटुंबियांना ?,  बोगस दाखले काढणाऱ्यांना की सर्वसामान्य नागरिकांना ?,  असा आशय असून विद्यमान आमदार, माजी आमदार आणि गावचे नेते गुंडगिरी संपवणार काय ? असा सवाल देखील फलकाच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

सध्या हे फलक चर्चेचा विषय ठरत असून निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा मजकूर सार्वजनिक ठिकाणी झळकल्याने राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. अनेकांनी या फलकाद्वारे समाजातील असंतोष आणि जनतेची भावना व्यक्त झाल्याचे मत मांडले, तर काहींनी अशा प्रकारचे फलक समाजात तेढ निर्माण करणारे ठरू शकतात, अशी चिंता व्यक्त केली आहे. या फलकावर कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेचे नाव नसल्याने हे फलक लावले कुणी याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा स्वरूपाचे फलक लावल्याने निवडणूक अधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेतात, फलक हटवण्याची कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.