गगनबावडा तालुक्यात काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार जाहीर

<p>गगनबावडा तालुक्यात काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार जाहीर</p>

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्य निवड मंडळाच्या मान्यतेनंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार शाहू महाराज, विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिसंगी मतदार संघातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अॅड. सोनाली विलास पाटील, तर असळज मतदार संघातून सर्वसाधारण प्रवर्गातून संभाजी शांताराम पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पंचायत समिती निवडणुकीसाठी तिसंगी मतदार संघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून अमर केशव कांबळे, असंडोली मतदार संघातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून छाया प्रकाश देसाई, असळज मतदार संघातून सर्वसाधारण प्रवर्गातून राजेश भगवान पाटील, तर धुंदवडे मतदार संघातून नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) म्हणून शुभांगी कुंडलिक संकपाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.