कागलमध्ये राजकीय समीकरणे बदलली ; मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे,समरजित घाटगे एकत्र तर संजय मंडलिक एकटे

<p>कागलमध्ये राजकीय समीकरणे बदलली ; मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे,समरजित घाटगे एकत्र तर संजय मंडलिक एकटे</p>

कोल्हापूर - कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे आणि समरजित घाटगे गट एकत्र आल्याने स्थानिक राजकारणात नवी आघाडी तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांना एकटं पाडण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, या बदलत्या राजकीय समीकरणांवर माजी खासदार संजय मंडलिक यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मला एकटं लढण्याची सवय आहे. ही आपत्ती नसून माझ्यासाठी संधी आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केलंय. राजकीय आव्हानांना सामोरे जात निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

कागल तालुक्यातील या घडामोडींमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे. नव्या आघाड्यांमुळे स्थानिक राजकारणात रंगत वाढली असून, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय.